Tuesday, 2 August 2016

नमस्कार ब्लॉगर्स,

सैराटच्या तुफान यशानंतर आता काही लोक त्यावर टीकाही करायला लागले आहेत. 

त्यांच्यासाठीच हा एक ब्लॉग. 

वाचून प्रतिक्रिया नक्की द्या ।

नागराज अण्णांच्या सैराट चित्रपटामुळे महाराष्ट्रात बलात्काराचे तसेच हत्यांचे प्रमाण वाढले आहे...
अशी विधानं कही लोक वाऱ्यासारखी पसरवत आहेत.

काही दिवसापूर्वी अण्णांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली. "सैराट चित्रपट करून मी चूक केली कि काय ? सिनेमाला सुळावर चढवा पण माझा पिच्छा सोडा. "

सिनेमातून दिलेला संदेश राहिला बाजूला... 
लोकांनी सैराट ला वेगळ्याच नजरेने पहिले...
 म्हणे, सैराट बघून महाराष्ट्रामधील युवा पिढी बिघडायला लागली आहे.
सैराट बघून जर लोकं बलात्कार व हत्या करायला लागले असतील तर, रंग दे बसंती बघून किती लोक क्रांतिकारी झाले ?
बॉर्डर बघून किती लोकांना सैन्यात जावसं वाटलं ?
आणि सिंघम बघून किती लोकांना आय. पी. एस. ऑफिसर झाले ?

एकच सांगतो... 

क्षेत्र कोणताही असो... तुमचा प्रभाव वाढू लागला कि बदनामी होणे अटळ आहे...

जो पर्यंत तुमच्यावर टीका होत नाही तो पर्यंत तुम्ही यशापासून फार दूर आहेत,हा जातीच्या गटारात अडकलेला मराठी माणूस आहे. 
जो पुढे जाणाऱ्या मराठी माणसाला मागे खेचतो हे सिद्ध झालयं. माणूस जगणं गांभीर्याने घेत नाही पण चित्रपट गांभीर्याने घेतो, आणि लोकशाहीच्या नावाखाली दुसऱ्याच्या खाजगी आयुष्याचा ठेकेदार बनतो. 

जोपर्यंत सैराट नव्हता तोपर्यंत सगळं नीट चाललं होत का ? 

लोकांनी चित्रपट पाहण्याची नजर बदलावी... 
बदल नक्कीच होईल.

जातीवाद विसरून लोकांनी माणुसकी हा धर्म स्वीकारायला हवा. 

जे आपण विचार आपण स्वतःच्या आई - बहिणी बद्दल करतो तेच विचार लोकांनी दुसऱ्यांच्या आई - बहिणी बद्दल पण करावा. 
कोपर्डी सारख्या घटनांना नक्कीच आळा बसेल. 

स्वतः या घटना रोखण्यात अपयशी ठरत असाल तर त्याच खापर चित्रपटांवर फोडून काही होणार नाही.

सल्ले आणि तक्रारी शिवाय महाराष्ट्रात फुकट असं काहीच मिळत नाही.